पुणे : कात्रजचे दूध दोन रुपयांनी महागले असून नवीन दरवाढ उद्यापासून म्हणजेच १ फेब्रुवारीपासून लागू होणार आहेत. कात्रज दूध संघाकडून गाय आणि म्हशीच्या दूध दरात वाढ करण्यात आली आहे.
पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाने गायीच्या दुधाच्या खरेदी आणि विक्री दरात प्रतिलिटरला दोन रुपये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. तर म्हशीच्या दूध विक्रीदरात दोन रुपयांची वाढ करण्यात आली आहे.
या निर्णयामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असला तरी दरवाढीचा बोजा ग्राहकांना सहन करावा लागणार आहे. ग्राहकांना प्रति लिटर दूधामागे आता दोन रुपये जास्त मोजावे लागणार आहेत. दूध खरेदीसाठी स्पर्धा वाढू लागली आहे. अधिक दर देणार्या डेअर्यांकडे संकलन वाढल्याने कात्रज दूधसंघाचे संकलन घटू लागले आहे.
त्यामुळे गायीच्या दूध खरेदी आणि विक्री दरात प्रतिलिटर दोन रुपयांनी वाढ करण्याचा निर्णय कात्रज संचालक मंडळाने घेतला आहे. त्यामुळे आता कात्रज डेअरीच्या टोण्ड, डबल टोण्ड, प्रमाणित आणि मलई दुधाचे दरात प्रतिलिटर दोन रुपयांची दरवाढ करण्यात आली आहे. यामुळे ग्राहकांना मोठा फटका बसणार आहे.