पुणे : वायुद्ध असोसिएशन ऑफ इंडिया या संघटनेच्या महाराष्ट्र राज्याच्या सचिवपदी प्रा. अमित गिरीगोसावी यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
वायुद्ध असोसिएशन ऑफ इंडिया (वायुद्ध असोसिएशन ऑफ इंडिया) हि एक संघटना असून महाराष्ट्र राज्याशी संलग्न आहे. या संघटनेत भारतीय पारंपरिक स्वसंरक्षण युद्ध कलेचे प्रकार घेतले जातात. या संघटनेच्यावतीने महाराष्ट्र राज्याच्या सचिवपदी प्रा. अमित गिरीगोसावी यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. यावेळी वायुद्ध असोसिएशन चे जनरल सेक्रेटरी सेन्सई सईद माझरुल इस्लाम, वर्किंग प्रेसिडेंट सेन्सेई विजय शहा आणि खजिनदार सेन्सेई रविंद्र कराळे आणि महाराष्ट्र संघटनेचे सर्व सभासद आणि जिल्हा संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी खेळाचे जनक सेन्सेई संतोष मोहिते मार्गदर्शन करताना म्हणाले कि, वायुद्ध म्हणजे वास्तविक युद्ध या खेळाचा इतिहास आणि सध्याच्या काळात असणारी स्वसंरक्षणाची गरज सर्वाना सांगतांना दैनंदिन जीवनातही या खेळाचा वापर करून निरोगी आरोग्य मिळवू शकतात व व्यक्तिमत्त्वात भर घालू शकतात. आणि या खेळामध्ये त्याचे करियर सुद्धा घडवू शतकातील अशी हमी दिली.
दरम्यान, भारतीय पारंपरिक युद्ध कलेच्या प्रचार आणि प्रसार करण्यासाठी भारतीय पारंपरिक युद्ध कलेच्या प्रचार आणि प्रसार करण्यासाठी व खेळाडूंना खेळाच्या सोयी-सुविधा पुरवण्यासाठी योग्य निर्णय घेण्यात आले आहेत.
महाराष्ट्र राज्याच्या सचिवपदी प्रा. अमित गिरीगोसावी यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल उपस्थित मान्यवरांनी गिरीगोसावी यांचे अभिनंदन केले. तसेच पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.