हडपसर : “मकर संक्रांती निमित्त व्यक्तिगत नात्यात गोडवा तर आणावाच, पण त्याच्याही पलीकडे जाऊन समाजाशी असलेले आपले नाते अधिक दृढ केले करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन भाजपा महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी केले.
हडपसर गावठाण येथील मनपा ३२ नंबर शाळेत भारतीय जनता पार्टी व स्मितसेवा फाऊंडेशन यांच्यावतीने ‘मकर संक्रांत तिळगुळ व हळदी कुंकू समारंभ’ व ‘होम मिनिस्टर’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात मुख्य अतिथी म्हणून चित्रा वाघ उपस्थित होत्या. यावेळी महिलांना मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या.
चित्रा वाघ यांचा भव्य सत्कार कार्यक्रमाच्या संयोजिका स्मिता तुषार गायकवाड यांनी शाल, पुष्पहार व श्री विठ्ठल – संत ज्ञानेश्वर – संत तुकाराम यांचे सुंदर शिल्प मूर्ती देवून करण्यात आला. यावेळी माजी नगरसेविका रंजना टिळेकर, पुणे शहर भाजपा महिला मोर्चा अध्यक्षा अर्चना पाटील, भाजपा बेटी बचाव बेटी पढाव आघाडी शहर संयोजिका आरती कोंढरे, माजी नगरसेविका उज्वला जंगले आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी प्रसिद्ध कलाकार किरण पाटील संचालित ‘ होम मिनिस्टर – खेळ पैठणीचा ‘ ह्या कार्यक्रमाने रंगत आणली. ‘होम मिनिस्टर’ खेळातील विजेत्या महिला स्पर्धकांना ‘पैठणी’ व परितोषिक वितरण चित्रा ताई वाघ यांचे हस्ते करण्यात आले. तसेच चित्रा वाघ यांच्या हस्ते उपस्थित महिलांना हळदीकुंकू व तिळगूळ व ‘वाण’ भेट देण्यात आले. यावेळी हडपसर परिसरातील महिला भगिनींनी यात सहभाग घेतला.
दरम्यान, यावेळी स्मिता गायकवाड यांच्या कार्य अहवालाच्या डिजिटल कॉपी’ चे प्रकाशन चित्रा वाघ यांचे हस्ते करण्यात आले.
यावेळी मीना पिंटो, ग्रेटा, पूनम फरांदे, वेदिता रासगे, तुषार गायकवाड, आण्णा बांदल, चितोडिया महाराज, डॉ. अशोक सोरगावी, परशुराम घनवट, सचिन इचके व इतर पदाधिकारी व कार्यकर्ते यांचे सहकार्य लाभले.
यावेळी आर.पी.आय. (आठवले गट) पुणे शहर महिला आघाडी अध्यक्षा शशिकला वाघमारे, भाजपा सोशल मिडिया सेल पुणे शहर महिला संयोजिका सविता गायकवाड, शोभा लगड, ओबीसी आघाडीच्या महिला अध्यक्षा सीमा शेंडे, छाया गदादे, अश्विनी ताई सुर्यवंशी, आरती आल्हाट, भाजपचे पदाधिकारी व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भाजपा ओबीसी आघाडी शहर उपाध्यक्षा स्मिता गायकवाड यांनी केले. तर हडपसर विधानसभा मतदारसंघ महिला मोर्चा अध्यक्षा स्वाती कुरणे यांनी आभार मानले.