पुणे : चित्रपटसृष्टीवर ९० च्या दशकात अविभाज्य राज्य गाजविणारी बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडनला पद्मश्री पुरस्कार २०२२ चा जाहीर करण्यात आला आहे. त्याचबरोबर संगीतकार एमएम कीरावानी यांना पद्मश्री, तर तबलावादक झाकीर हुसेन आणि राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या पार्श्वगायिका वाणी जयराम यांना पद्मविभूषण आणि पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला दरवर्षीप्रमाणे यंदा देखील पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. यावेळी एकूण १०६ जणांना पद्म पुरस्कार देण्यात येणार आहे. यामध्ये ६ पद्मविभूषण, ९ पद्मभूषण आणि ९१ पद्मश्री देण्यात येणार आहेत. यामध्ये वरील चित्रपटसृष्टीतील ४ जणांना पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
Honoured & grateful. Thank you, GoI, for acknowledging my contributions, my passion & purpose – cinema & arts, that allowed me to contribute, not only to the film industry but also beyond. I owe this to my father: Actor Raveena Tandon
(Pic: Raveena Tandon's Instagram Handle) https://t.co/2FoXnDbz6W pic.twitter.com/i7m0BJBg8T
— ANI (@ANI) January 25, 2023
अभिनेत्री रवीना टंडनने १९९१ मध्ये ‘पत्थर के फूल’ या चित्रपटामधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. यानंतर त्यांनी अनेक सुपरहिट चित्रपट दिले. रवीन टंडनचे चित्रपटसृष्टीत योगदान पाहून केंद्र सरकारने तिला पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्याची घोषणा केली आली आहे.
दरम्यान, २०२२ मधील लोकप्रिय ठरलेल्य़ा ब्लॉकबस्टर ‘RRR’ चित्रपटामधील ‘नातू नातू’ गाण्याचे संगीतकार एमएम कीरावानी यांना देखील पद्मश्री देण्याची घोषणा करण्यात आली आहे. तसेच तबलावादक झाकीर हुसेन आणि राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या पार्श्वगायिका वाणी जयराम यांना पद्मविभूषण आणि पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
याबाबत बोलताना रवीना टंडन म्हणाल्या, “मी सन्मानित आणि कृतज्ञ आहे. मला अजूनही विश्वास बसत नाही. माझे योगदान, माझे आयुष्य, माझी आवड आणि उद्देश ज्याने मला केवळ बॉलिवूडच नव्हे, तर त्यापलीकडेही योगदान दिले, त्याची दखल घेतल्याबद्दल भारत सरकारचे धन्यवाद. या प्रवासात ज्यांनी मला मार्गदर्शन केले त्या सर्वांचे मी आभार मानते. यासाठी मी माझे वडील रवी टंडन यांची देखील ऋणी आहे.”