पुणे : मोठ्या बहिणीनेच लहान बहिणीसोबत अश्लील कृत्य केल्याची धक्कादायक घटना पुण्यातील विमाननगर परिसरात एका उच्चभ्रू सोसायटीत रविवारी (ता.२२) रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या घटनेने सगळीकडे संताप व्यक्त केला जात आहे. नेमका विश्वास कोणावर ठेवावा? यावर आता प्रश्नचिन्ह उपस्थित झाला आहे. विमाननगर पोलीस ठाण्यात मोठ्या बहिणीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी एका १८ वर्षीय तरुणीने विमाननगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिडीत मुलगी आणि आरोपी महिला या नात्याने दोघी सख्ख्या बहिणी आहेत. पिडीत लहान बहिण ही सध्या बारावीमध्ये शिक्षण घेत आहे. तर संशयित आरोपी असलेल्या बहिणीचे लग्न झाले. तीचे देखील पदवीपर्यंत शिक्षण झाले आहे. मात्र ती वडिलांकडेच राहते.
दरम्यान, रविवारी (ता.२२) लहान बहिण घराच्या हॉलमध्ये झोपली असताना मोठी बहिण तेथे आली. आणि लहान बहिणीशी अश्लील कृत्य करायला सुरुवात केली. त्यानंतर दोघींमध्ये वादावादी झाली. तरीही मोठ्या बहिणीने तिच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. मात्र लहान बहिणीने वारंवार कृत्याला विरोध केला. या दोघींमधील वाद वाढला आणि लहान बहिणीने थेट पोलिसांत धाव घेतली.
मोठ्या बहिणीने गैरप्रकार केल्याबाबत लहान बहिणीने घडलेला प्रकार पोलिसांना सांगितला. हा प्रकार ऐकून पोलिसही चक्रावले. तिने दिलेल्या तक्रारीवरून मोठ्या बहिणीवर गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास विमाननगर पोलीस करीत आहेत.