अजित जगताप
वडूज : महिला माता-भगिनी यांनी आपल्या गुणवत्ता व समाजाच्या काळजीच्या भावनेतून विधायक कार्य सुरू ठेवलेले आहे. अशा महिलांनी स्वतःची काळजी घ्यावी. या भावनेतून वडूज (ता. खटाव) येथील अस्मिता लोकसंचालित साधन केंद्र यांच्या वतीने आयोजित केलेल्या महिला आरोग्य शिबिर उपक्रम चांगला असल्याचे मत ज्येष्ठ पत्रकार व येरळा दर्शनचे संपादक धनंजय शिरसागर यांनी केले.
वडूज (ता. खटाव) येथील महिला आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून अस्मिता लोकसंचालित साधन केंद्र या ठिकाणी आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
यावेळी मजूर फेडरेशनचे माजी संचालक सी एम पाटील, सामाजिक कार्यकर्ते विजयकुमार शिंदे, नगरसेवक बनाजी पाटोळे व सिद्धेश्वर कुरोलीचे माजी सरपंच राजू फडतरे, सारिका लावंड, सागर पाटील, पत्रकार अजित जगताप व ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. स्वप्नाली देशपांडे, पर्यवेक्षक वर्षांराणी ओमासे, ज्योती देशमुख व संयोगिनी वर्षा तावडे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शन करताना ओमासे यांनी जीवनसत्व व आरोग्य बाबत रक्त वाढीसाठी असणाऱ्या उपयुक्त पदार्थ व फळभाज्या फळे याच्याबद्दल सविस्तर माहिती देऊन महिलांमध्ये जागृती निर्माण केली. सध्या महिलांना चहा व मिसरीची व्यसन आहे. हे व्यसन घातक असून त्याचा महिलांनी त्याग केला पाहिजे. असे स्पष्ट केले.
विजयकुमार शिंदे यांनी ग्रामीण भाषेत सांगितलं की सध्या पूर्वीसारखं अन्नधान्य मिळत नाही तसेच कसदार धान्य मिळत नसल्यामुळे महिलांची शारीरिक क्षमता कमी झाली असली तरी अलीकडे फास्ट फूड व बेकरी फूड यावरती अनेक कुटुंब अवलंबून असते. ही बाब बरोबर नाही. त्यामुळे पित्त वाढ होते. हे रोखण्यासाठी चांगल्या आहाराची गरज आहे असे स्पष्ट केले.
धनंजय शिरसागर यांनी महिलांच्या आरोग्याबाबत शासकीय पातळीवर विविध योजना राबवल्या जातात. त्याचा महिलांनी फायदा घ्यावा असे सुचित केले. यावेळी डॉक्टर तसेच सामाजिक कार्य व महिला कार्यकर्ता यांनीही मार्गदर्शन केले.
यावेळी खटाव तालुक्यातील अनेक गावातील महिला बचत गटाचे काम करणाऱ्या कार्यकर्त्या उपस्थित होत्या. सहयोगिनी वर्षा तावडे यांनी अल्पावधीतच कार्यक्रमाचे चांगले व नेटके नियोजन केल्याने महिलांनी ही चांगला प्रतिसाद दिला. यावेळी आभार दिपाली चव्हाण यांनी मानले.