पुणे : व्होडाफोन-आयडियाची प्रीपेड सेवा उद्या रविवारी (ता.२२) १३ तासांसाठी बंद असणार आहे. या दरम्यान ग्राहक फोन रिचार्जही करू शकणार नाहीत. असे कंपनीने ग्राहकांना संदेश पाठवून सांगितले आहे.
कंपनीच्या संदेशात असे म्हटले आहे की, प्रीपेड रिचार्ज सुविधा २२ जानेवारी रोजी रात्री ८ वाजल्यापासून बंद होईल. ही सेवा १३ तास बंद राहणार असून दुसऱ्या दिवशी सोमवारी (ता.२३) सकाळी 9.30 नंतर सुरू होईल. कंपनीने हा संदेश आपल्या सर्व प्रीपेड वापरकर्त्यांना त्यांच्या मोबाईलवर हिंदी आणि इंग्रजी या दोन्ही भाषांमध्ये पाठवला आहे.
दरम्यान, या काळात कोणत्याही ग्राहकाला कोणतीही अडचण येऊ नये, अशी कंपनीची इच्छा आहे, त्यामुळे आधीच अलर्ट करण्यात येत आहे. तुम्ही जर व्होडाफोन-आयडियाचा प्रीपेड नंबर वापरत असाल आणि तुमचे रिचार्ज संपणार असेल, तर आजच रिचार्ज करा. अन्यथा १३ तास तुम्ही अडचणीत सापडू शकता.