पुणे : इयत्ता तिसरीत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीचा परीक्षेचा पेपर लिहिताना दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना पंढरपुरात घडली आहे.
अनन्या भादुले (वय.९) असे मृत्यू झालेल्या विद्यार्थिनीचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अरिहंत इंग्लिश स्कूल मध्ये इयत्ता तिसरीत शिकणारी अनन्या गेल्या दोन दिवसांपासून आजारी होती. अनन्या दररोज प्रमाणे गुरुवारी (ता. १९) सकाळी पेपर देण्यासाठी शाळेत गेली. पेपर लिहिताना तिला झटका आला आणि ती खाली कोसळली.
त्यानंतर , अनन्याला तातडीने शिक्षकांनी रुग्णालयात नेले. त्यापूर्वीच त्या चिमुकलीचा मृत्यू झाला. ब्रेन हॅमरेजमुळे तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. या घटनेमुळे शाळेत आणि परिसरात शोककळा पसरली आहे.