पुणे : पुणे ग्रामीण पोलीस दलात मोठे फेरबदल करण्यात आले असून, १२ पोलीस निरीक्षक व ६ सहाय्यक पोलीस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत. पोलीस निरीक्षकांच्या बदल्यांचे आदेश गुरुवारी (ता.१९) अपर पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी काढले आहे.
पोलीस अधिकाऱ्यांच्या जिल्हा अंतर्गत बदली व पदस्थापना करण्यासाठी जिल्हा पोलीस आस्थापना मंडळाची स्थापना करण्यात आली आहे. या घटकाचे आस्थापनेवरील पोलीस अधिकारी यांची बदली / पदस्थापना करण्याकरिता बैठक आयोजित करण्यात आली होती. यांमध्ये जिल्हा आस्थापना मंडळाने खालील नमूद पोलीस अधिकारी यांची प्रशासकीय निकड व जनहित लक्षात घेऊन त्यांची बदली / पदस्थापना करण्यात आली आहे.
सध्या तात्पुरत्या स्वरुपात पुढील आदेशापर्यंत पोलीस ठाण्यांचा कार्यभार सांभाळत असलेले पोलीस अधिकारी यांची प्रशासकीय निकड व जनहित लक्षात घेतले आहे. त्यामुळे ते सध्या कार्यरत असलेल्या पोलीस ठाण्यास अतिरिक्त कार्यभार सांभाळत असलेल्या दिनांकापासून नियमित पदस्थापना करण्यास मान्यता दिली आहे.
दरम्यान, पोलीस अधिकारी यांचा सध्या कार्यरत असलेल्या ठिकाणी विहित केलेला ०२ वर्ष सेवा कालावधी पूर्ण झाला नसून, मुदतपूर्व बदलीचे अनुषंगाने प्रशासकीय निकड व जनहित लक्षात घेऊन नमूद अधिकारी यांची खालीलप्रमाणे मुदत पूर्व बदली/ पदस्थापना करण्यात येत आहे.
बदली झालेल्या पोलीस निरीक्षकाचे नाव आणि कंसात कोठून कोठे
१)दिलीप शिशुपाल पवार (आर्थिक गुन्हे शाखा- इंदापूर पोलीस ठाणे)
२)नारायण विनायक पवार (यवत पोलीस ठाणे -जुन्नर पोलीस ठाणे)
३)हेमंत गणपत शेडगे (शिक्रापूर पोलीस ठाणे -यवत पोलीस ठाणे)
४)राजकुमार बालाजी केंद्रे (आर्थिक गुन्हे शाखा – खेड पोलीस ठाणे)
५)विकास अहिलप्पा जाधव (जुन्नर पोलीस ठाणे – जिल्हा विशेष शाखा)
६)प्रमोद अंबादास क्षीरसागर (आळेफाटा पोलीस ठाणे – शिक्रापूर पोलीस ठाणे )
७)यशवंत कृष्णा नलावडे (सुरक्षा शाखा – आळेफाटा पोलीस ठाणे
८)संतोष दिनकर जाधव (नियंत्रण कक्ष – सुरक्षा शाखा)
९)वैशाली रावसाहेब पाटील (नियंत्रण कक्ष – अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष AHTU)
१०)विजयसिंह भगवान सिंह चौहान (अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष AHTU तात्पुरता कार्यभार खेड पोलीस ठाणे – डायल ११२)
११) प्रभाकर माधवराव मोरे – (डायल-११२, तात्पुरता कार्यभार बारामती तालुका पोलीस ठाणे – बारामती तालुका पोलीस ठाणे, कायम)
१२) भाऊसाहेब नारायण पाटील (जीविशाखा तात्पुरता कार्यभार दौंड पोलीस ठाणे- दौंड पोलीस ठाणे, कायम)
बदली झालेल्या सहाय्यक पोलीस निरीक्षकाचे नाव आणि कंसात कोठून कोठे
१)सचिन कोमलसिंग राऊळ – (लोणावळा ग्रामीण पोलीस ठाणे- उपविभागीय पोलीस अधिकारी लोणावळा उपविभाग यांचे वाचक)
२)देविदास हिरामण करंडे – (उपविभागीय पोलीस अधिकारी लोणावळा उपविभाग यांचे वाचक – लोणावळा ग्रामीण पोलीस ठाणे
३)सचिन विठठलराव कांडगे – (सायबर पोलीस ठाणे – ओतूर पोलीस ठाणे)
४)महादेव चंद्रकांत शेलार- (नियंत्रण कक्ष – स्थानिक गुन्हे शाखा)
५)सचिन संतराम काळे – (स्थानिक गुन्हे शाखा- वडगाव निंबाळकर पोलीस ठाणे)
६)विक्रम नारायण साळुंखे – (शिक्रापूर पोलीस ठाणे,तात्पुरता कार्यभार वालचंदनगर पोलीस ठाणे – वालचंदनगर पोलीस ठाणे कायम)