पुणे : पुणे, मुंबई आणि नागपूरसाठी म्हाडाने तिन्ही उत्पन्न गटासाठी लॉटरी जाहीर केली आहे. यासाठी अर्ज भरण्याच्या आणि रजिस्ट्रेशनच्या प्रक्रियेला सुरुवात झाली. पुण्यात ५ हजारहून अधिक घरांसाठी लॉटरी निघाली आहे. त्यापैकी दोन हजारहून अधिक घरे जो पहिल्यांदा येणार त्याला मिळणार आहेत. त्यामुळे अर्ज करणाऱ्यांसाठी या तारखे महत्वाचे ठरणार आहे.
‘हे’ कागदपत्र लागणार…
अर्ज करणाऱ्यांसाठी तुमचा रहिवासी दाखला, उत्पन्न, पॅन कार्ड, आधार कार्ड, १५ वर्ष महाराष्ट्रात रहात असल्याचा पुरावा आणि कोट्यातून घर घेत असाल तर त्यासंबंधित कागदपत्र सादर करणे आवश्यक आहे. या कागदपत्रांच्या पडताळणीनंतरच पुढची प्रक्रिया केली जाईल.
‘या’ तारखा महत्त्वाच्या…
६ जानेवारी- रजिस्ट्रेशन आणि अर्ज करण्यासाठी सुरुवात
७ जानेवारी- पेमेंटची सुरुवात
५ फेब्रुवारी – अर्ज करण्याचा शेवटचा दिवस
६ फेब्रुवारी- ऑनलाइन पेमेंटचा शेवटचा दिवस असणार आहे.