पुणे : लग्न न करण्याची धमकी देऊन तरुणीबरोबर बळजबरीने शारीरीक संबंध ठेऊन त्यानंतर या संबंधांचे फोटो व व्हिडिओ नातेवाईकांमध्ये व्हायरल केल्याची घटना पुण्यात उघडकीस आली आहे. याप्रकणी येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सिद्दालिंगाप्पा मल्लाप्पा मादर (वय २९,रा. शुभम सोसायटी, सोपाननगर, वडगाव शेरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. विमाननगर येथे राहणार्या एका २५ वर्षाच्या तरुणीने येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, आरोपीने फिर्यादीसोबत लग्न जमवले होते. तिच्याकडे वेळोवेळी शारीरीक संबधांची मागणी केली. त्याला तिने नकार दिला. त्यावेळी त्याने लग्न न करण्याची धमकी दिली. ते कर्नाटकातील घरात असताना त्याने फिर्यादीबरोबर शारीरीक संबंध ठेवले.
त्यानंतर पुण्यात आल्यावर येरवड्यातील हॉटेलमध्ये नेऊन फिर्यादीबरोबर संबंध ठेवले. यावेळचे फिर्यादी यांचे फोटो व व्हिडिओ मोबाईलवर बनविले. त्यानंतर त्याने लग्नास नकार देऊन फिर्यादीचे फोटो व व्हिडिओ फिर्यादीचे नातेवाईकांमध्ये व्हायरल करुन बदनामी केली. याप्रकणी पिडीत तरुणीने येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार आरोपी सिद्दालिंगाप्पा मल्लाप्पा मादर याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.