अजित जगताप
सातारा : बालमनावर उत्तम संस्कार निर्माण केले की ते बालक सुद्धा एक चांगला संदेश देत असते. याची प्रचिती एका चिमुकल्या अनया श्रीराज भगवान हिने इको फ्रेंडली श्री गणेशा मूर्ती तयार करून दाखवून दिले आहे. या तिच्या कल्पकतेला चांगलीच दाद दिली असून तिने सातारचे नाव उज्वल केले आहे. अशा शब्दात तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
बालपणापासून कलेची आवड असलेल्या अनया हिने शालेय जीवनामध्ये विविध कलागुणांना वाव देण्यासाठी स्पर्धेमध्ये सहभाग घेतला होता. विबग्यावर हायस्कूल, हिंजवडी, पुणे येथे इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकत आहे. त्याबद्दल तिला पुरस्कार व बक्षीस सुद्धा मिळालेले आहे प्रशस्तीपत्र ही मिळालेले आहे.
जगभर पर्यावरणाचा ऱ्हास होत असताना मोठ्या प्रमाणात प्रदूषण वाढलेले आहे. याची आता जाणीव होत असून इको फ्रेंडली गणेश मूर्ती तसेच इतर मूर्ती तयार केल्यास त्यापासून मानवी जीवनाला कोणत्याही धोका नाही. हा संदेश देण्यासाठी या चिमुकल्याने एक दमदार पाऊल उचललेले आहे.घरातील कुंडी मधील माती व कावचा वापर करून श्री गणेश मूर्ती तयार केली.
याबाबत प्रसारमाध्यमांनी ही तिचे कौतुक केले आहे. तिचा खास गौरव करून तिच्या कर्तव्याला वाव दिला आहे. तिचे वडील श्रीराज व आई धनश्री हे संगणक अभियंता आहेत. आजोबा डॉ अजित भगवान व आजी सौ. विजया भगवान यांचे ही मार्गदर्शन लाभले आहे. याबद्दल राज्यसभेचे खा. छत्रपती उदयनराजे भोसले, हरणाई सुत गिरणीचे सर्वसर्वा रणजितसिंह देशमुख, डॉ महेश गुरव, इम्रान बागवान,परेश जाधव, राजू फडतरे आदी मान्यवरांनी कुमारी अनया भागवत हिचे अभिनंदन केले आहे.