दीपक खिलारे
इंदापूर : इंदापूर तालुका बार असोसिएशनच्या वतीने आज गुरुवारी (ता. १२) रोजी दुपारी पावणे दोन वाजता इंदापूर न्यायालय येथे ई-फायलिंग संदर्भात कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती बार असोसिएशनचे सचिव ॲड. आशुतोष भोसले यांनी दिली आहे.
तसेच ॲड. सचिन झालटे-पाटील यांचे ‘मृत्यूपूर्व जबाब व प्रत्यक्षदर्शी साक्षीदार’ या विषयावर देखील व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. या आयोजित कार्यशाळेस व व्याख्यानासाठी बार च्या वकिलांनी उपस्थित राहण्याचे आवाहन इंदापूर तालुका बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड . मनोहर चौधरी व उपाध्यक्ष ॲड. सुभाष भोंग व ॲड. जमीर मुलाणी यांनी केले आहे.