पुणे : शाळेत सुरु असलेल्या गुड टच बॅड टच कार्यक्रमातून ११ वर्षाच्या मुलीचा तिचे आजोबाच विनयभंग करीत असल्याचा धक्कादायक प्रकार कोंढवा येथे नुकताच उघडीस आला आहे.
हा प्रकार डिसेंबर २०२२ मध्ये घडला होता. याबाबत एका २३ वर्षाच्या महिलेने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी आजोबांना अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सदर मुलगी हि इयत्ता चौथीच्या वर्गात शिकत आहे. त्यानुसार फिर्यादी या त्याच वर्गातील मुलांचे गुड टच बॅड टच याचे सत्र घेत होत्या. यावेळी चौथीत शिकणार्या एका ११ वर्षाच्या मुलीने आपल्यावरील प्रसंग फिर्यादी यांना सांगितला. तिने सांगितले की घरात कोणी नसताना माझे दादाजी मला मांडीवर घेऊन बसत आणि अश्लिल चाळे करीत असल्याची माहिती सदर फिर्यादी यांना दिली.
दरम्यान, मी ओरडले तर माझे तोंड दाबून गप्प करीत. व त्यांना विरोध केला तर नख लावत. मला घाणेरडे व्हिडिओ दाखवत, असे सांगितले. त्यानंतर या महिलेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करुन आजोबाला अटक केली आहे.