लहू चव्हाण
पाचगणी : पाचगणी येथील भारती विद्यापीठ हायस्कूलमध्ये आयोजित केलेल्या पाककला स्पर्धेत विद्यार्थ्यांनी उस्फुर्त सहभाग घेतला आहे. विद्यार्थ्यांना पोषण आहार व आरोग्य याचे महत्त्व पटवून देण्यासाठी पाककलाकृती स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.
पाचगणी (गोडवली ता.महाबळेश्वर) येथील भारती विद्यापीठ हायस्कूल येथे पाक कलाकृती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत सर्वच मुला मुलींनी सहभाग घेतला होता. स्पर्धेत विद्यार्थ्यांनी डोसा,कोबी वडी,कट वडा,गाजर हलवा,शेंगा वडी,भाकरी पिठलं,चिकन,भेळ यांसह विविध खाद्यपदार्थ सादर झाले.
सदर स्पर्धेचे परीक्षक म्हणून गोडवली येथील जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापिका सुरेखा हिरवे व सुचेता मालुसरे यांनी काम पाहिले. या स्पर्धेत जीवन मूल्यांचे संवर्धन आणि स्वनिर्मित या बाबींचा विचार करून प्रथम तीन क्रमांक निवडण्यात आले.
प्रथम क्रमांक साहिल मोहिते (इयत्ता ९वी) द्वितीय क्रमांक वैष्णवी पवार (इयत्ता ९ वी) तृतीय क्रमांक काजल मालुसरे (इयत्ता १० वी) स्पर्धेतील विजयी विद्यार्थ्यांचे व या स्पर्धेचे आयोजन केलेल्या पुष्पलता माने यांचे भारती विद्यापीठ हायस्कूलचे मुख्याध्यापक शहाजी सावंत यांनी अभिनंदन केले.
स्पर्धा यशस्वी होण्यासाठी सर्व शिक्षक शिक्षकेतर सेवक यांनी सहकार्य केले.