अजित जगताप
सातारा : पत्रकार हे लोकशाहीचा आरसा आहे. जे समाजात घडते त्याचे प्रतिबिंब आरशात दिसून येते. पत्रकारांनी दररोज पौष्टिक आहार घेऊन आपले शरीर संपदा चांगली ठेवावी असा सल्ला धोंडेवाडी (ता खटाव जि सातारा) येथील मातोश्री मालन चव्हाण यांनी वडूज ता खटाव येथे पत्रकारांच्या सत्कारा निमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात मार्गदर्शन केले.
यावेळी जेष्ठ पत्रकार डॉ. विनोद खाडे, नितीन राऊत, लालासाहेब माने, अजित जगताप व अजित कंठे व विकल्प गोडसे, चव्हाण कुटुंबीय उपस्थित होते. येथील जे पी फार्मा, वडूज येथे पत्रकार दिनाच्या निमित्ताने झालेल्या छोट्याशा कार्यक्रमात उपस्थित पत्रकारांना सेंद्रिय शेती व आहाराबाबत ही मार्गदशन केले.
पूर्वीच्या काळी वाहन साधने मर्यादित होती. चालण्याचा व्यायाम होत होता. आता दुचाकी, चार चाकी वाहने व मोबाईल मुळे तरुण पिढीला आरोग्यासाठी खूपच कमी वेळ मिळत आहे. त्यातच काही पत्रकार व्यसन करीत आहेत. ही बाब चिंताजनक आहे.
दरम्यान, यावेळी धोंडेवाडी सोसायटी चेअरमन जगन्नाथ जाधव, छत्रपती शिवाजी महाराज कॉलेज उपाध्यक्ष पृथ्वीराज चव्हाण, शिवाई शिक्षण संस्थेचे रमेश गोडसे, प्राचार्या सुरेखा गोडसे, डॉ. महेश गुरव, राजू फडतरे, परेश जाधव, धनाजी चव्हाण, विजय शेटे, विजयकुमार शिंदे,निवृत्त तहसिलदार विलास गडांकुश,ओंकार चव्हाण, नयना जावळे, संतोष भंडारे, कुणाल गडांकुश, सुरज पोतदार, ऋषिकेश पडळकर, देवानंद थोरात, मुकुंद माने, शुभम रामुगडे, योगेश हिरवे यांनी ही पत्रकार दिनाच्या निमित्ताने प्रभावीपणे पत्रकारिता करणाऱ्या पत्रकारांना शुभेच्छा दिल्या.