लहू चव्हाण
पाचगणी : मुंडाशा या कादंबरीतून तापोळा परिसरातील जनतेचे सुख – दुःख सांगितले आहे. ही कादंबरी वाचकांच्या पसंतीस उतरेल असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते जगन्नाथ शिंदे यांनी लिहिलेल्या मुंडाशा नावाच्या कादंबरीचे प्रकाशन दरे या गावी झाले. त्यावेळी ते बोलत होते.
या प्रसंगी पुरूषोत्तम जाधव, डॉ. रामचंद्र पार्टे, विजय भिलारे, मिलिंद शिंदे, शिंदेवाडीचे सरपंच धनंजय शिंदे, जे. के. आंब्राळे, प्रविण भिलारे, किसन भिलारे उपस्थित होते.
लेखक जगन्नाथ शिंदे म्हणाले, तापोळा येथे मी तीन वर्षे होतो, येथील निसर्गाने मला भुरळ घातली, येथील डोंगरा एवढ्या माणसांच्या सावलीत या कादंबरीचे लेखन केले. येथील भुमिपुत्र मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन झाले याचा आनंद मोठा आहे.
कादंबरी लिहिताना त्यांच्याशी या विषयासंदर्भात सविस्तर चर्चा झाली होती. त्यामुळे बऱ्याच गोष्टी मला उमलज्या त्याबद्दल मी त्यांचा मनापासून आभारी आहे.