राहुलकुमार अवचट
यवत : दर्पणकार आचार्य बाळकृष्ण जांभेकर यांची जयंती मराठी पत्रकार दिनाचे औचित्य साधून ०६ जानेवारी रोजी दौंड तालुक्यातील चौफुला येथील श्री बोरमलनाथ मंदिर येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाची सुरवात आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन ज्येष्ठ पत्रकार राजू जगदाळे व रमेश वत्रे यांचे हस्ते करुन करण्यात आले. यावेळी नरेंद्र जगताप यांनी प्रास्तविक करताना दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या बाबतीत अनेक गोष्टींना उजाळा दिला. राजु जगदाळे यांनी नविन पिढीने देखील पत्रकार व्हावे अशी अपेक्षा व्यक्त केली.
यावेळी कार्यक्रमास उपस्थित असलेल्या पोपटराव किसनराव थोरात महाविद्यालयातील प्राध्यापिका सुनिता बनकर – म्हेत्रे यांनी पत्रकार हा लोकशाहीचा फार महत्वाचा घटक असुन पत्रकार दिनाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या. यावेळी प्राजक्ता शिंदे व साई दिक्षित यांनी प्रथमच पत्रकार दिन पाहत असल्याचे सांगत पत्रकार होण्याची इच्छा व्यक्त केली. यावेळी रमेश वत्रे यांनी पुर्वीची पत्रकारीता मध्ये आलेले अनेक अनुभव सांगितले पुर्वी पत्रकारिता अधिक परिश्रमाची होती आत्ताची पत्रकारिता ही त्याप्रमाणात सुलभ झाल्याचे सांगितले. पत्रकार जयवंत गिरमकर यांची खरेदी – विक्री संचालकपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल सन्मान करण्यात आला.
यावेळी माजी धर्मादाय आयुक्त देशमुख साहेब यांनी उपस्थितांना पत्रकार जिवनातील काही अनुभव सांगुन शुभेच्छा व्यक्त केल्या.
यावेळी दौंड तालुका पत्रकार संघाच्या वतीने बोरमलनाथ गोशाळेला एक दिवसाचा चारा देण्यात आला. दौंड तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष रवींद्र खोरकर यांनी उपस्थितांचे आभार मानले तर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रकाश शेलार यांनी केले. यावेळी ज्येष्ठ पत्रकार एम.जी. शेलार, उपाध्यक्ष राजू जगदाळे, संदीप चाफेकर, प्रशांत वाबळे, गौरव गुंदेचा,राहुल अवचर, राहुलकुमार अवचट, बापू नवले, निलेश जांबले, मनोज खंडागळे, वीरेंद्र वंजारी, बोरमलनाथ देवस्थान ट्रस्टचे आबा शेलार, पोपटराव किसनराव थोरात महाविद्यालयाचे प्रा.विकास धुमाळ, आरती सुतार, प्रदिप बोत्रे यांसह विद्यार्थी व विद्यार्थ्यांनी उपस्थित होते.