राहुलकुमार अवचट
यवत : येथील भीमा- पाटस कारखान्याचे पहिल्या पंधरवड्यातील पहिल्या ३५ हजार टनाचे २५०० रुपये प्रति टनाप्रमाणे पाहिल्या हप्त्याचे नऊ कोटी रुपये संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आले असल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष आमदार राहुल कुल यांनी दिली.
ऊस तोडणी वाहतुकीचे बिलही प्रत्येकी दहा दिवसानंतर अदा करण्यात आलेले आहे .कारखान्याने दि.५ जानेवारी अखेर ५५ हजार टनाचे गाळप केले असून शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त ऊस कारखान्याला देऊन सहकार्य करावे, असे आवाहन कारखान्याचे चेअरमन तथा आमदार राहुल कुल यांनी केले.