युनूस तांबोळी
शिरूर : शिरूर लोसकसभा मतदार संघाचे माजी खासदार व शिवसेनेचे माजी उपनेते शिवाजीराव आढळराव पाटील यांनी लांडेवाडी (ता. आंबेगाव) येथे पत्रकारदिनाच्या निमित्ताने काव्यसंध्येचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास शिरूर, आंबेगाव, जुन्नर, खेड या परिसरातील पत्रकारांनी हजेरी लावली. यावेळी आढळराव पाटील म्हणाले की, गेल्या सहा महिण्यात राजकारणामध्ये वेगवेगळया घडामोडी घडल्या. मात्र, न थांबता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली विकास कामांसाठी २९ कोटीचा निधी आणला. खेड पंचायत समितीच्या इमारतीला १४ कोटी निधी मिळवला. थांबलो नाही अन यापुढे ही थांबणार नाही. २०२४ च्या निवडणुकीत तुमच्या पाठिंब्याने उभा राहणार आहे.
मानाच मान अन पैशाच रान, दादा मला अशी खुर्ची आण…
खुर्चीतला राजा, अन ऐतीहासीक दाढी, बैलगाडा घाटात, मालिकेची घोडी.
लोकांच्या सुखदुखांच नाही जिला भान… दादा मला अशी खुर्ची आण…
काव्यसंध्येच्या सुरवातीलाच कोडीभाऊ पाचर्णे यांच्या या कडव्यांनी टाळ्या अन शिट्ट्या मिळविल्या.
ऊरात होतय धडधड, बंदी नोटावंर आली.
अन हजार पाचशे बदलून घ्या, मोदीं ची आज्ञा झाली.
आता अधिर झालोया, आता बधिर झालोया
अन बॅल्क मनी व्हाइट करता जेरीस आलोया
….उडतय बुंगाट…
कवी अनिल दिक्षीत यांनी राजकीय वातावरण पाहून नोटाबंदीवर विडंबन कविता सादर केली. या त्यांच्या कवीतेने अधिकच राजकीय वातावरण गडद झाले.
मालिकेतला शिवाजी खरा खुरा कधीच नसतो
भुल थांपाना फसलेला मतदार फक्त रडत असतो.
विकासाची वाट पहात थकली आई बाई
चेहरा कुठेच दिसेना ऐकू येते फक्त कोल्हे कोई.
मतदाराला ही कळल चुकला आपला वादा
जनतेच्या दरबारातला पुन्हा हवा दादा…पुन्हा हवा दादा.
कवी संतोष गाढवे यांच्या कवितेला यावर चांगल्याच टाळ्या मिळाल्या.
त्यानंतर कवी दिक्षीतांनी पत्रलेखन या कवितेतून
सगळ्यात जादा गर्दी खेचून गाजविल्या मी सभा,
परंतू माझ्या इंजीनाला मिळतो एकच डबा,
मी सभाच घेऊ की नको काय ते पत्रात लिव्हा..,
पुन्हा मी येईन म्हटलो जरी झालो मी उपमुख्यमंत्री,
प्रगती म्हणू की अधोगती हे कळेना केमेस्ट्रि,
मी शपथ घेऊ की नको हे पत्रात लिव्हा…,
अशी अनेक पत्रलेखन त्यांनी कवितेतून सादर केल्यावर चांगलाच हशा या काव्यसंध्येत झाला.
कवितेतुनी इतुके द्यावे की भरूनी द्यावी झोळी, मी निघून गेल्यावरती, मागे उराव्या ओळी… या कवितेने कवी दुर्वेश सोनार यांनी वेगवेगळ्या कविता सादर करत या राजकिय काव्य संध्येचा समारोप केला.