पुणे : “तुम्ही तुमचा धर्म सोडून द्या, आणि येशूची पूजा करा”, असे सांगून काही जणांचा आळंदीमध्ये धर्मपरिवर्तन करण्याचा प्रयत्न केल्याची घटना उघडकीस आली आहे.
याप्रकणी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद देण्यात आली आहे. त्यानुसार, सुधाकर सुर्यवंशी यांच्यासह तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी पाच वर्षापासून स्मशानभूमीत काम करतात. फिर्यादी घरात असताना तीन व्यक्ती त्यांच्या घरात शिरल्या. त्यानंतर त्यांनी तुमचे सगळे आजार ख्रिश्चन धर्माच्या प्रार्थनेने बरे करतो असे सांगितले. तसेच घरातील सर्व देव टाकून द्या त्यानंतर तुमच्या जीवनातील सगळे आर्थिक आणि आरोग्याच्या समस्या दूर करण्यासाठी येशू ख्रिस्तांची पूजा करायला सांगून त्यांनी फिर्यादी आणि आजूबाजूच्या लोकांमध्ये अंधश्रद्धा पसरवण्याचा प्रयत्न केला.
तसेच तुमचे देव फेकून द्या. मातंग समाजाचे देव भंगार आहे. तुमचे देव टाकून दिले तर तुम्हाला दवाखान्यात जाण्याची गरज नाही. असे सांगत त्यांनी येशूचं रक्त म्हणून अनेकांना द्राक्षाचं पाणी पाजल्या दिले. आम्ही तुम्हाला आजारांपासून बरे करु. येशू ख्रिस्तांकडे चांगले मंत्र आहेत. आमच्या प्रार्थना श्रेष्ठ आहे, असे सांगून फिर्यादी आणि त्यांच्या परिसरात राहणाऱ्या लोकांना मानसिक त्रास दिला. त्यासोबतच मातंग धर्माचा अपप्रचारही केला आहे. त्यावेळी हा प्रकार कोण करत आहे, याची खात्री फिर्यादी यांनी केली.
दरम्यान, सुधाकर सुर्यवंशीने हा प्रकार केल्याचे उघड झाले. त्यांनंतर फिर्यादी यांनी पोलीस ठाण्यात धाव घेऊन याप्रकणी फिर्याद दिली. त्यानुसार सुधाकर सुर्यवंशी यांच्यासह तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.