लोणी काळभोर, (पुणे) : लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लोणी काळभोर (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील बल्लाळवस्ती परिसरात हातभट्टी दारू बनविणाऱ्या अड्ड्यावर लोणी काळभोर पोलिसांनी छापा टाकून ११ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तर गावठी दारू बनवीत असलेल्या ठिकाणी दोन व्यक्तीवर लोणी काळभोर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
शेखर मधुकर काळभोर (वय ४५, रा. बल्लाळवस्ती, रामदरा रोड लोणी काळभोर, ता. हवेली), रामकुमार जयप्रसाद लोधी (वय – २४ धंदा मजुरी रा. रामदरा रोड, बल्लाळवस्ती लोणीकाळभोर, रा. हिडोलनी पोस्ट बनभरीया तहसील अमेठी, जि. सुरतानपुर, राज्य उत्तरप्रदेश अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय चव्हाण यांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी (ता. ०४) लोणी काळभोर पोलीस ठाण्यातील पोलीस शिपाई बाजीराव वीर यांना यांना एका खबऱ्याकडून माहिती मिळाली कि, बल्लाळवस्ती परिसरात गावठी हातभट्टी दारू तयार करणेकरीता हातभट्टीचे रसायन व साहित्यासह गावठी दारु बनवित आहेत. त्या अनुशंघाने वरिष्ठाच्या आदेशानुसार सदर ठिकाणी पोलिसांनी छापा टाकला असता, मोठ्या पत्राच्या भांड्यामध्ये गुळ, तुरटी, व पाणी यांचे एक हजार लिटर रसायन साहित्याशी गावठी दारू बनवीत असताना वरील दोघेजण आढळून आले.
दरम्यान, त्या ठिकाणी असलेल्या मालाची पाहणी केली असता १० हजार रुपये किमतीचे हातभट्टी तयार करण्याचे पक्के रसायन, १ हजार रुपयांचे पत्र्याचे भांडे असा ११ हजार रुपयांचा मुद्देमाल मिळून आला. उर्वरित साहित्य जागीच नष्ट केले.
सदरची कामगिरी लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय चव्हाण, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुभाष काळे यांचे मार्गदशनाखाली पोलीस उपनिरीक्षक अमित गोरे, पोलीस हवालदार नितीन गायकवाड, पाटोळे, पोलीस नाईक नागलोत, देविकर, पुंडे, जाधव, बाजीराव वीर, कुदळे, पोशि सोनवणे यांचे पथकाने केली आहे.