दीपक खिलारे
इंदापूर : क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती तसेच पत्रकार दिनाच्या निमित्ताने पत्रकार विजय शिंदे व जितेंद्र जाधव यांनी इंदापूर पंचायत समिती येथे आयोजित केलेल्या वक्तृत्व स्पर्धेत मोठ्या गटात ज्ञानेश्वरी कावडे, लहान गटात सिद्धी नाना तनपुरे व यशोधरा अमर चंदनशिवे यांनी प्रथम क्रमांक मिळवला आहे. स्पर्धेचे बक्षीस वितरण बारामतीचे उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे यांच्या हस्ते संपन्न झाले.
वकृत्व स्पर्धेचे उद्घाटन बुधवारी (दि.ड़४) इंदापूरचे तहसिलदार श्रीकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले होते. आज झालेल्या बक्षीस वितरण सोहळ्यासाठी स्वप्नील सावंत, पत्रकार नीलकंठ मोहिते, महेंद्र रेडके, सतिश पांढरे, दिलीप पाटील, अनिता खरात, पोपट शिंदे, कैलास कदम, अमोल चंदनशिवे, जेष्ठ पत्रकार महेश स्वामी, पत्रकार निलकंठ मोहिते, सागर शिंदे, राहुल ढवळे, इम्तियाज मुलाणी, नानासाहेब लोंढे, प्रकाश आरडे, शिवाजी पवार, समीर सय्यद, सोनकांबळे, दत्तात्रय गवळी व अशोक घोडके आदी उपस्थित होते.
दरम्यान, स्पर्धेचे परीक्षक म्हणून संदीपान पाडूळे, अमोल राऊत व नानासाहेब सानप यांनी काम पाहिले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जितेंद्र जाधव यांनी केले तर सूत्रसंचालन सचिन देवडे व नानासाहेब सानप यांनी केले. व उपस्थितांचे आभार विजय शिंदे, उदय देशमुख, दीपक खिलारे यांनी मानले.
तालुकास्तरीय वकृत्व स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे –
इ.१ली. ते इ.४ थी :
प्रथम क्रमांक यशोधरा अमर चंदनशिवे (गोखळी) द्वितीय क्रमांक संस्कृती रणजीत जगताप, (जि.प.शाळा कालठण नं.२) तृतीय क्रमांक अंजुम जमीर शेख (शाळा – विद्या प्रतिष्ठान, इंदापूर), उत्तेजनार्थ ईश्वरी केदार जाधव (जि. प.शाळा कालठण नं.२)
लहान गट क्र.५ वी.ते इ.७ वी :
प्रथम क्रमांक; सिद्धी नाना तनपुरे (शाळा : जयभवानी विकास प्रतिष्ठान, लाखेवाडी)
द्वितीय क्रमांक तनिष्का गणेश जाधव.(शाळा : जयभवानी विकास प्रतिष्ठान, लाखेवाडी )
तृतीय क्रमांक राजश्री गणेश जाधव. (गुरुकुल इंग्लिश मीडियम, इंदापूर ), उत्तेजनार्थ अक्षरा संतोष गव्हाणे (भिमाई आश्रमशाळा, इंदापूर), शर्वरी सचिन देवडे.( बोरी हायस्कूल)
मोठा गट इ. ८ वी ते इ. १०वी
प्रथम क्रमांक : कावडे ज्ञानेश्वरी चंद्रकांत (ना.रा.हायस्कूल, इंदापूर)
द्वितीय क्रमांक : वाबळे विद्या पवण (प्रगती विद्यालय, लोणी देवकर)
तृतीय क्रमांक : आदित्य बाजीराव भारती ( ना.रा हायस्कूल, इंदापूर )
उत्तेजनार्थ सोनाली दिलीप जाधव (क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले माध्यमिक आश्रमशाळा, इंदापूर), भाग्यश्री हनुमंत व्यवहारे
(ना.रा.हायस्कूल इंदापूर), चैतन्य लहू झगडे (अवसरी हायस्कूल)