पुणे : कोंढवा परिसरात माणुसकीला काळीमा फासणारी अमानुष घटना घडली आहे. तरुणाला मारहाण करून त्यांच्यावर अनैसर्गिक लैगिंक अत्याचार करत त्याचे व्हिडिओ शुटींग काढल्याचा घृणास्पद प्रकार कोंढवा परिसरात घडला आहे. हि घटना दुराणी कॉम्प्लेक्स मिठानगर, कोंढवा) येथे सोमवारी (ता. १८) रात्री साडे आकरा वाजण्याच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे.
शाहेब अन्सारी (वय-३५) व अन्वर अन्सारी (वय -४०, रा. दोघेही दुराणी कॉम्प्लेक्स, मिठानगर, कोंढवा) अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. याप्रकरणी १९ वर्षाच्या तरुणाने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
कोंढवा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी संध्याकाळी आकरा वाजण्याच्या सुमारास फिर्यादी हे घरी जात असताना उत्तर प्रदेशातील गावातील ओळखीचा शोहेब अन्सारी हा आला. त्याने फिर्यादी याला मोटरसायकलवर बसवून त्याच्या फ्लॅटवर नेले. तेथे त्याला मारहाण केली. त्याच्या मोठ्या भावाला बोलावून घेतले. त्याचे हातपाय बांधून अनैसर्गिक अत्याचार केला. त्याचे अन्वर अन्सारी याने व्हिडिओ रेकॉर्डिंग केले. त्यानंतर अन्वर यानेहि फिर्यादी याच्यावर अनैसर्गिक बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. सहायक पोलीस निरीक्षक तोरगल तपास करीत आहेत.