बीड : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या गाडीला परळीत येथे अपघात झाला आहे. स्वतः धनंजय मुंडे यांनी यासंदर्भात फेसबुक पोस्ट करत माहिती दिली आहे.
धनंजय मुंडे म्हणाले की, मंगळवारी दिवसभर मतदारसंघातील कार्यक्रम व भेटी आटोपून परळीकडे परतताना रात्री 12.30 वाजण्याच्या सुमारास परळी शहरात माझ्या वाहनचालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने छोटासा अपघात झाला आहे. माझ्या छातीला किरकोळ मार लागला असून डॉक्टरांनी विश्रांतीचा सल्ला दिला आहे. काळजी करण्यासारखे काही नाही, कृपया अफवांवर विश्वास ठेवू नये, अशी माहिती त्यांनी फेसबुकवर पोस्ट करून दिली आहे.
दरम्यान, धनंजय मुंडे यांना दुपारी दोनच्या दरम्यान ॲम्बुलन्सद्वारे लातूरहून मुंबई येथील ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी नेण्यात येणार असल्याची माहिती आहे