मुंबई : दीपक हुडा व आंतरराष्ट्रीय पदार्पण करणाऱ्या शिवम मावी यांच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर भारतीय संघाने श्रीलंकेला केवळ २ धावांनी पराभूत करताना टी -२० मालिकेची विजयी सुरुवात केली.
श्रीलंकेने नाणेफेक जिंकताना भारताला फलंदाजीचे निमंत्रण दिले. भारताने निर्धारित २० षटकांत ५ बाद १६० ही धावसंख्या उभारली. सलामीवीर ईशान किशनने २९ चेंडूत ३ चौकार व २ षटकार यांच्या साहाय्याने ३७ धावांची खेळी केली. टी -२० पदार्पण करणारा शुभमन गिल व सूर्यकुमार यादव यांनी प्रत्येकी ७ धावा करताना झटपट बाद झाले. त्यानंतर संजू सॅमसन देखील ५ धावा करताना तंबूत परतला. त्यानतणार हार्दिक पंड्याने २७ चेंडूत २९ धावांची तडाखेबंद खेळी केली.
पंड्या बाद झाल्यानंतर दीपक हुडा व अक्षय पटेल यांनी अजून पडझड होऊ दिली नाही. दीपक हुडाने आक्रमक फलंदाजी करताना ४ षटकार व १ चौकाराच्या मदतीने २३ चेंडूत ४१ धावा केल्या. अक्षर पटेलने देखील दीपक हुडाला सुरेख साथ देताना २० चेंडूत ३१ (३ चौकार, १ षटकार) धावांचे योगदान दिले. श्रीलंका संघाकडून दिलशान मधूशंका, महिश थिक्षणा,चामीका करुणारत्ने, धनंजय डिसिल्वा, वनिंदूं हंसरंगा यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.
श्रीलंका संघाने निर्धारित २० षटकांत सर्वबाद १६० धावाच करता आल्या. पदार्पण करणारा शिवम मावीने केलेली भेदक गोलंदाजी व त्याला मिळालेली उमरान मलिक व हर्षल पटेल यांनी दिलेली साथ यामुळे भारताने श्रीलंकेवर २ धावांनी विजय मिळवीला. श्रीलंका संघाकडून दूषन शनकाने ४५ (२७ चेंडू, ३ चौकार, ३ षटकार), कुशल मेंडिसने २८ (५ चौकार), चामीका करुणारत्नेने २३ (२ षटकार) व वनिंदूं हंसरंगा २१ (१ चौकार, २ षटकार) धावांची खेळी केली. परंतु ते संघाला विजय मिळवून देऊ शकले नाहीत. आक्रमक ४१ धावांची खेळी करणाऱ्या दीपक हुडाला सामानावीर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.