पुणे : कौटुंबिक वादातून पतीने स्वत: पेटवून घेऊन पोलीस ठाण्यात जाऊन पत्नीने मला पेटवून दिल्याचा आरोप केल्याचे तपासात निषपन्न झाले आहे. हि घटना शुक्रवारी (ता. ३०) चंदननगर परिसरात सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास घडली होती.
लखन काळे (वय ३२, रा. शिरूर) असे तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी लखन याच्या पत्नीसह सासू, सासरे यांच्याविरोधात चंदननगर पोलीस ठाण्यात हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. मात्र परंतु तपासात जखमीने स्वतःलाच पेटवून घेऊन सासू आणि सासऱ्यावर आरोप केल्याचं स्पष्ट झालं आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लखन हा मूळचा शिरूरमधील रहिवासी आहे. कामानिमित्त तो आणि त्याची पत्नी पुण्यातल्या चंदननगरच्या फुटपाथवरील झोपडीत राहतात. काही वर्षांपूर्वी त्यांचं लग्न झालं होतं. मात्र पती आणि पत्नीमध्ये सतत वाद होत असायचे. त्यामुळे पत्नीने आपल्या आई-वडिलांना बोलावून लखनला समज देण्याचा प्रयत्न केला.
दरम्यान, दुसऱ्या दिवशी लखनने स्वत: लाच पेटवून दिलं आणि पत्नीने आपल्या आई-वडिलांच्या मदतीने मला पेट्रोल टाकून जाळून दिले अशी फिर्याद पोलीस ठाण्यात दिली होती. परंतु पोलिसांनी अधिक तपास केला असता लखनने स्वत:च पेटवून घेतल्याचं स्पष्ट झाले आहे.