कोंढवा : येथील मेफेअर सोसायटीजवळील साई मंदिराच्यापाठीमागे मोकळया मैदानात एका ३०-३५ वर्षीय महिलेचा अर्धवस्त्र अवस्थेतील मृतदेह आढळून आल्याची घटना सोमवारी (ता. ०२) सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली आहे.
या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून मृतदेह पोलिसांनी पुढील तपासणीसाठी मृतदेह ससून रूग्णालयात दाखल करण्यात आल्याचे कोंढवा पोलिसांनी सांगितले आहे. अद्याप ओळख पटलेली नसून ओळख पटविण्याचे काम सुरू आहे. प्रकरणाचा पुढील तपास कोंढवा पोलिस करीत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी (ता. ०२) सकाळी एनआयबीएम रोडवर एका मोकळया मैदानात अर्धवस्त्र अवस्थेतील महिलेचा मृत असल्याची माहिती कोंढवा पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह पुढील तपासणीसाठी ससून रूग्णालयात दाखल केला आहे.