पुणे : एका बाजूला नवीन वर्षाचे जल्लोषात आणि उत्साहात स्वागत करण्यात येत असताना दुसरीकडे पृथ्वीवर मोठे संकट येण्याची शक्यता आहे. ७२ फुटांचा एका विशाल उपग्रह पृथ्वी दिशेने सकरत असल्याचे नासाने स्पष्ट करताना धोक्याचा इशारा दिला आहे.
नासा सातत्याने अंतराळात होत असलेल्या बदलांची आणि त्यांच्या संभावित धोक्याची माहिती सातत्याने देत असते. एक विशाल ७२ फुटांचा उपग्रह पृथ्वीचे देशाने सरकत असल्याचे नासाने जाहीर केले आहे. नासाचे या उपग्रहाचा वेग, पृथ्वीपासून त्याचे अंतर खूप जवळच आहे.
नासाच्या जेट प्रोपल्शन लॅबने दिलेल्या माहितीनुसार २०२२ YR1 नावाचा उपग्रह १ जानेवारी २०२३ रोजी पृथ्वीच्या सर्वात जवळ पोचणार आहे. त्याचे पृथ्वीपासून अंतर केवळ ६ लाख २५ हजार किमी असणार आहे. विमानाच्या आकाराचा हा उपग्रह साधारण २४ हजार ७४४ किमी प्रति तास (६.०४ किमी / सेकंड) या वेगाने पृथ्वी दिशेने सरकत आहे.
अंतराळामध्ये लघुग्रह, धूमकेतू, उल्का यांसारख्या असे अनेक घटक आहेत. हे घटक कधी-कधी त्यांच्या कक्षेत फिरताना पृथ्वीच्या जवळ येऊ शकतात. गुरुत्वाकर्षणामुळे पृथ्वीभोवतीच्या वस्तूही ग्रहाकडे आकर्षित होतात. त्यामुळे लघूग्रह, उल्का यांसारखे घटक पृथ्वीच्या अगदी जवळून जातात, पण त्याचा पृथ्वीला धोका नसतो.
दरम्यान, गेल्या लाखो वर्षात लघुग्रह पृथ्वीवर एकापेक्षा जास्त वेळा आदळले आहेत. या संदर्भात नासाने आता थेट पृथ्वीच्या दिशेने येणाऱ्या लघुग्रहाबाबत अलर्ट जारी केला आहे. नासाचे प्लॅनेटरी डिफेन्स कोऑर्डिनेशन ऑफिस पृथ्वीच्या ८ दशलक्ष किलोमीटरच्या आत येणाऱ्या जवळ-अर्थ ऑब्जेक्ट्स म्हणजे खगोलीय वस्तूंबद्दल अलर्ट जारी करते.