पुणे : सोशल मीडियावर अनेकदा जातीय द्वेष पसरवून समाजामध्ये वेगळा संदेश दिला जातो. यामुळे अनेकदा समाजामध्ये भांडण निर्माण होते. यामुळे पोलीस प्रशासनाने एक निर्णय घेतला आहे. यामुळे सोशल मीडिया वापरताना काळजी घ्यावी लागणार आहे.
भीमा कोरेगावमध्ये शौर्यदिनासाठी मोठ्या संख्येने अनुयायी अभिमानदनासाठी येत असतात. यामुळे पुणे शहर पोलीस सहआयुक्त संदिप कर्णिक यांनी शहर पोलीस आयुक्तालयाच्या आज रात्री पासून २ जानेवारी मध्यरात्रीपर्यंत १४४ प्रमाणे प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहेत.
यामध्ये महत्वाच्या म्हणजे सोशल मीडियावर अफवा, जातीय द्वेष पसरवणारे खोटे संदेश, खोटी माहिती पोस्ट करणार नाहीत किंवा फॉरवर्ड करणार नाही याची जबाबदारी संबंधित पोस्ट करणारी व्यक्ती आणि ग्रुप ॲडमिनची असणार आहे. यामुळे काळजी घ्यावी लागणार आहे.
दरम्यान, पोलीसांच्या लेखी परवानगीशिवाय बॅनर, फ्लेक्स, होर्डिंग लावण्यास प्रतिबंध राहील. यात शासकीय विभाग आणि यंत्रणांना सवलत राहील, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
राज्य राखीव दलाच्या ७ तुकड्या बंदोबस्तासाठी नेमण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे येणाऱ्या प्रत्येक अनुयायांनी शिस्त बाळगुन शौर्यदिन साजरा करावा, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.