पुणे : महाराष्ट्रात सत्तांतर झाल्यानंतर अधिकाऱ्यांच्या बदपणाची प्रक्रिया वेगाने सुरु आहे. सहा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. काही दिवसांपूर्वी ३० वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या.
महापालिका निवडणुका २०२३ च्या सुरवातीलाच होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर या बदल्या महत्त्वाच्या मानल्या जात आहेत. यामध्ये राजेश पाटील आणि अजय गुल्हाने यांच्यासह आणखी चार अधिकाऱ्यांचा समावेश आहे.
सैनिक कल्याण संचालक, पुणे राजेश पाटील यांची सहव्यवस्थापकीय संचालक सिडको, नवी मुंबई या पदावर नियुक्ती करण्यात आलेली आहे. अश्विन ए. मुदगल (सहव्यवस्थापकीय संचालक सिडको, नवी मुंबई) यांना महानगर आयुक्त एमएमआरडीए, मुंबई म्हणून नियुक्ती देण्यात आली आहे.
अजय अण्णासाहेब गुल्हाने यांची नागपूर स्मार्ट सिटी सीईओ म्हणून पदभार देण्यात आला आहे. दीपक सिंग यांची अतिरिक्त आयुक्त पीएमआरडीए म्हणून नियुक्ती करण्यात आली. भाग्यश्री बानायत यांना नाशिक येथे अतिरिक्त मनपा आयुक्त म्हणून नियुक्ती देण्यात आलीय. तर डॉ. इंदुराणी जाखर यांची वर्णी एसएव्हीआयएसच्या व्यवस्थापकीय संचालकपदी लागली आहे.