दिनेश सोनवणे
दौंड : पुणे, सातारा, कोल्हापूर, अहमदनगर या जिल्ह्यातील सुमारे १५०० विद्यार्थ्यांची अबॅकस स्पर्धा संपन्न झाल्याची माहिती प्रो ऍक्टिव्ह अबॅकसचे संचालक गिरीश करडे यांनी दिली. या स्पर्धेत केडगाव (ता दौंड) येथील तब्बल ३२ विद्यार्थ्यांची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली.
या परीक्षेस सनराईज अबॅकस केडगावमधून ५९ विद्यार्थी परीक्षेत बसले होते. कल्पना नवले व मोनिका टेंगले यांनी विजयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
छोट्या गटातील यशस्वी विद्यार्थी :
गौरी टुले, अद्वैत मेमाणे, खुशी लवटे, जिया शेलार, शरन्या शेळके, आरोही साळवे, आरुषी साळवे, जुई रणदिवे, अंकिता नेवसे, मानव आतवाणी, रोहित जगताप, कार्तिक जाधव, ओमकार काळभोर.
मोठ्या गटातील यशस्वी विद्यार्थी :
सार्थक जगताप, शौर्य निवंगूने, श्रेयश शेलार, गंधार नवले, अमृता नेवसे, आलीया मुलानी, समृद्धी जगताप, सनाया शिंदे, श्रेया शेळके, आराध्या राऊत, हर्ष वाघ, ओवी गायकवाड, स्वराज वांझरे, आशुतोष बारवकर, जयदीप ओव्हाळ, रुद्र आहेरकर, राजवीर टुले, विराज जाधव.