पुणे : सध्या चालकांना लर्निंग लायसन्स काढण्यासाठी द्यावी लागणारी चाचणी अधिक पारदर्शक झाली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून याबाबत तक्रारी येत होत्या. यामुळे आता पुणे आरटीओ कार्यालयाने उमेदवारांची चाचणी ‘इन कॅमेरा’ सुरु केली आहे. यामुळे अनेकांना दिलासा मिळाला आहे.
विशेष म्हणजे आता ही चाचणी घरातूनही देता येईल. यासाठी वेब कॅमेरा वापरला जाणार आहे. यामध्ये मात्र काही नियम लागू करण्यात आले आहेत. राज्याच्या मोटार वाहन विभागाने वाहन चाचणी प्रणालीत पहिल्यांदाच ‘फेसलेस’ची सुविधा विकसित केली आहे.
फेसलेस’ची सुविधा सुरु झाल्यावर काही दिवसांतच याविषयी तक्रारी वाढल्या आहेत. चाचणी सुरू असताना कोणाचा मोबाईल जरी वाजला तरी त्या आवाजाची नोंद होऊन संबंधित उमेदवाराला बाद केले जात आहे, असेही अनेकांनी सांगितले आहे.
यामध्ये तुम्हाला काळजी घ्यावी लागणार आहे. चाचणी दरम्यान उमेदवाराने मान जरी हलविली, तरीही त्याला बाद केले जाते. त्यामुळे फेसलेस चाचणीला विरोध होत आहे.
यामुळे यामध्ये वेब कॅमेरा सुरू ठेवावा, पुरेशा प्रमाणात वीज, इंटरनेट कनेक्शन, आजूबाजूला कोणताही आवाज नको, शेजारी कोणतीही हालचाल नको, असे नियम पाळावे लागणार आहेत.