हनुमंत चिकणे
उरुळी कांचन, (पुणे) : उरुळी कांचन (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील महात्मा गांधी रोडवर असलेल्या एका सोसायटीतील दुचाकी अज्ञात दोन चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना घडली आहे. मंगळवारी (ता. २७) रात्री पाऊणे दहा वाजण्याच्या सुमारास घडली आहे. सदर दोन चोरटे हे सीसीटीव्हीत कैद झाले आहेत.
व्हिडीओ पाहण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा….
https://www.facebook.com/reel/451470637029744
प्रशांत भुजबळ असे दुचाकी चोरीला गेलेल्या गाडीमालकाचे नाव आहे. अद्यापपर्यंत लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, प्रशांत भुजबळ यांनी महात्मा गांधी रोडवरील काळे कॉम्प्लेक्स येथे त्यांची दुचाकी हिरो कंपनीची स्प्लेंडर दुचाकी (एम.एच.१२ क्यू. जे. ०३२०) रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास लावली होती. रात्री पाऊणे दहा वाजण्याच्या सुमारास अज्ञात दोन चोरटे हे चालत आले व सोसायटीत शिरले. यावेळी दोन्ही बाजूला त्यांनी कोणी नसल्याचा फायदा घेत दोन मिनिटाच्या आत सोसायटीत लावलेली दुचाकीचा असलेले लॉक तोडून सोलापूर महामार्गाकडे निघून गेले.
दरम्यान, मागील काही दिवसांपासून लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीत सोरतापवाडी, उरुळी कांचनसह परिसरात भुरट्या चोरट्यांचा धुमाकुळ सुरु असून नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.
उरुळी कांचन ग्रामपंचायत हद्दीत रविवारी भरणाऱ्या आठवडे भाजीमंडई बाजारात मोबाईल फोन चोरीला गेल्याची घटना प्रत्येक घडत आहेत. मागील काही दिवसापूर्वी ही रविवारच्या आठवडे बाजारात चक्क एका पोलीस कर्मचाऱ्याचा व एका पत्रकाराच्याही मोबाईलवर चोरट्यांनी डल्ला मारला होता. एवढ्या घटना होऊनही चोर का मिळत नाहीत अशी चर्चा नागरिक करून लागले आहेत.
पोलिसांची गस्त केवळ नावालाच..!
पोलिसांकडून गस्ती पथके नेमलेली असतानाही अशा वाढलेल्या चोऱ्यांमुळे परिसरात दहशतीचे वातावरण आहे. तर पोलिस मात्र सुस्तावलेल्या अवस्थेत असून कोणतीही कारवाई होताना दिसत नसल्याने शहरात पोलिस आहेत की नाही, असाच प्रश्न उपस्थित होतो आहे. पोलीस ठाण्यातील स्थानिक गुन्हे शाखा मात्र सुस्त असल्याने तपास कधी लागणार असा प्रश्न उपस्थित होत आहे.
त्यामुळे लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीत वाढत चालेलेल्या घटनेमुळे शहरात पोलिस आहे की नाही, असाच प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. पोलिसांच्या सुस्तावले पणामुळेच अशा घटनेत वाढ होत असून अशा घटना वाढू लागल्या असल्याचे नागरिक बोलू लागले आहेत.