पुणे : बाणेर भागात सोसायटीच्या पार्किगमध्ये खेळणारी अल्पवयीन शाळकरी मुलगी आणि तिच्या मैत्रिणीशी अश्लील चाळे करणाऱ्या सुरक्षारक्षकास चतु:शृंगी पोलिसांनी अटक केली. याप्रकणी अल्पवयीन मुलीच्या आईने चतु:शृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलसांनी सुरक्षारक्षकाला बेड्या ठोकल्या आहेत.
अहमद जलालउद्दीन हुसेन (वय २०, रा. हाटकोला, जि. करीमगंज, आसाम) असे अटक करण्यात आलेल्या सुरक्षारक्षकाचे नाव आहे
मिळालेल्या माहिती नुसार, तक्रारदार महिलेची दहा वर्षांची मुलगी आणि तिची मैत्रीण सोसायटीच्या आवारात खेळत होत्या. त्या वेळी हुसेन याने मुलीशी जवळीक साधून अश्लील चाळे केले. त्यानंतर मुलगी आणि मैत्रिणीचे मोबाइलवर छायाचित्र काढले. या घटनेची माहिती मुलीने आपल्या आईला दिली. त्यानंतर आईने चतु:शृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
दरम्यान, आरोपी अहमद जलालउद्दीन हुसेन यांच्यावर बाललैंगिक अत्याचार प्रतिबंध कायदा (पोक्सो) आणि विनयभंग केल्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहे.