पुणे : सीमकार्ड सुरु ठेवण्याचे बहाण्याने सायबर चोरट्याने एकाला पाच लाखाला ऑनलाइन गंडा घातल्याची धक्कादायक घटना पुण्यातील सदाशिव पेठेत घडली आहे.
याप्रकरणी एकाने विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलीस ठाण्यात सायबर चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदाराच्या मोबाइल क्रमांकावर शुक्रवारी (ता.२३ डिसेंबर) अनोळखी व्यक्तीचा फोन आला. आणि तुम्माच्या मोबाइलमधील सीमकार्ड बंद पडण्याची शक्यता आहे. तुम्हाला सीमकार्ड सुरू (ॲक्टिव्हेट) करण्यासाठी रिचार्ज करावे लागेल, अशी बतावणी केली.
त्यानंतर चोरट्याने तक्रारदाराला दहा रुपयांचे रिजार्च करावे लागेल, असे सांगितले. तक्रारदाराने दहा रुपये ऑनलाइन पद्धतीने चोरट्याला पाठविले. त्यानंतर चोरट्याने तक्रारदाराच्या बँक खात्यातून ऑनलाइन पद्धतीने ४ लाख ९० हजार रुपये लंपास केले.
दरम्यान, याप्रकरणी एका व्यक्तीने विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलीस ठाण्यात सायबर चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दादासाहेब गायकवाड करीत आहेत.