पुणे : बँकेत नोकरी मिळावी यासाठी अनेकांचा प्रयत्न असतो. त्यात काहींना यश मिळते तर काहींना प्रतिक्षाच करावी लागते. तुम्ही देखील नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी ही अत्यंत आनंदाची बातमी असणार आहे. कारण, बँक ऑफ बडोदा येथे मेगा भरती केली जात आहे. यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांना ऑनलाईन माध्यमातून अर्ज करता येणार आहे. पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.
बँक ऑफ बडोदा येथे उप-संरक्षण बँकिंग सल्लागार (DDBA), खाजगी बँकर – रेडियन्स खाजगी, गट प्रमुख, प्रदेश प्रमुख, वरिष्ठ संबंध व्यवस्थापक, संपत्ती धोरणकार (गुंतवणूक आणि विमा), उत्पादन प्रमुख-खाजगी बँकिंग, पोर्टफोलिओ संशोधन विश्लेषक या पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु होत आहे. यासाठी परीक्षा आणि मुलाखत घेतली जाणार आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला महाराष्ट्रात कुठंही जाऊन नोकरी करावी लागणार आहे. यासाठी 15 एप्रिल 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार आहे.
या प्रक्रियेंतर्गत 146 रिक्त पद भरले जाणार आहे. संबंधित उमेदवाराची निवड ही मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे. या भरती प्रक्रियेंतर्गत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. मात्र, या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी https://www.bankofbaroda.in/ या अधिकृत वेबसाईटवरून माहिती घेता येणार आहे.