लहू चव्हाण
पाचगणी : मुरबे (ता.पालघर) येथील सेवा आश्रम विद्यालय, कला वाणिज्य व तांत्रिक कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राध्यापक ज्ञानदेव तुळशीराम शिंदे यांचा सेवापूर्ती सोहळा महाविद्यालयाच्या प्रांगणात मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
शिंदे सरांच्या ३४ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर वयोमानानुसार आज (२४ डिसेंबर) सकाळी अकरा वाजता संस्था चालक व्ही. जी. पाटील, प्रकाश बाविस्कर, समाधान सुर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली हा सोहळा संपन्न झाला.
यावेळी व्यासपीठावर महाविद्यालयाच्या प्राचार्या वंदना राऊत, स्मिता माळवदे, माजी प्राचार्य बी. टी. वाणी, पांडुरंग शिंदे, उत्तेरेश्वर माने, रामराव सुरवसे, मदन पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी ज्ञानदेव शिंदे यांच्या कार्याचा गौरव म्हणून प्राचार्य वंदना राऊत यांच्या हस्ते त्यांना सन्मानपूर्वक मानपत्र प्रदान करुन सपत्नीक त्यांचा भव्य सेवापुर्ती सन्मान सोहळा साजरा करण्यात आला आणि त्यांना पुढील आयुष्यासाठी सर्वांनी मन:पुर्वक शुभेच्छा दिल्या.
यावेळी बोलताना व्ही.जी.पाटील म्हणाले शिक्षक शाळेतून निवृत्त होतो पण सामाजिक, राजकीय, सहकार, क्षेत्रातून कधीच निवृत्त होत नाही. सेवानिवृत्तीनंतर आपल्या ज्ञानाचा उपयोग समाजाच्या हितासाठी करावा.
बाविस्कर सर यांनी शिंदे सरांच्या कामगिरीचा गौरवपूर्ण उल्लेख करून त्यांची शिस्त, कामाची पद्धत, त्यांची विद्यार्थीप्रिय वागणूक या संदर्भात आपले विचार मांडले. यावेळी समाधान सुर्यवंशी, स्मिता माळवदे, रामराव सुरवसे सर, सुजाता शिंदे यांनी मते व्यक्त केली. सुषमा भोसले यांनी शिंदे सरांचा परिचय करून दिला.
कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजन व दिपप्रज्वलनाने झाली. प्रास्ताविक अनिल पाचागंणे, सुत्रसंचलन रुपाली कोकणे, एन.व्ही. भोये तर आभार नवनीत वाढू यांनी मानले.