पुणे : चंदुकाका सराफ ज्वेलर्सचे नाव वापरून एका सायबर चोरट्याने ट्रेझरी बॅंकेला तब्बल १९ लाखाचा गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यात नुकताच उघडकीस आहे.
याप्रकरणी ट्रेझरी बॅंकेच्या व्यवस्थापकाने बंडगार्डन पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार भामट्याच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सायबर चोरट्याने ट्रेझरी बॅंकेच्या व्यवस्थापकाला फोन केला आणि चंदुकाका सराफ अँड सन्स या प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे डायरेक्टर किशोर शहा बोलत असल्याचा फोन करुन एक बनावट मेल पाठवण्यात आला. तसेच स्टेट बँकेच्या व्यवस्थापकाला मी तुमचा महत्वाचा कस्टमर आहे. असे सांगितले. तसेच माझे नातेवाईक आजारी आहेत. असे खोटी बतावणी करून व्यवस्थापकाला तातडीने पैसे पाठवण्यास सांगितले.
दरम्यान, या सायबर चोरांनी बॅंक व्यवस्थापकाचा विश्वास संपादन केला आणि त्यांना शहा याचवे नाव सांगून सायबर चोरट्यांनी २ वेगवेगळ्या बँक खात्यावर पैसे पाठवण्यास सांगितले. हा सगळा प्रकार बनावट असल्याचं बॅंक व्यवस्थापकाच्या लक्षात आला. त्यानंतर त्यांनी पोलिसांत धाव घेतली.
त्यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी फोन करणाऱ्या व्यक्तीवर गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.