सागर जगदाळे
भिगवन : कुंची कोरवे समाज भिगवण यांच्यातर्फे रविवारी दिनांक २५ डिसेंबर २०२२ रोजी भव्य अशा स्व.रमेश जाधव चषक कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे.स्पर्धेचे उद्घाटन माझी सहकार व संसदीय कार्यमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते होणार आहे तर कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून भिगवण पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप पवार हे उपस्थित राहणार आहे.तसेच या स्पर्धेसाठी विशेष उपस्थिती म्हणून आंतरराष्ट्रीय कबड्डी खेळाडु रशीद शेख हे उपस्थित राहणार आहे.
स्पर्धेचे हे सहावे पर्व असून या स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिकासाठी रोख रक्कम पंधरा हजार,द्वितीय क्रमांकासाठी अकरा हजार,तृतीय क्रमांकासाठी सात हजार तर चतुर्थ क्रमांकासाठी पाच हजार रुपये अशी चार पारितोषिके ठेवण्यात आली असून सर्व क्रमांकासाठी आकर्षक चषक ठेवण्यात आले आहेत.स्पर्धा ही ६५ किलो वजनी गटामध्ये भरविली असून गाववाईज सामने खेळविले जाणार आहेत अशी माहिती आयोजक बापू पवार यांनी दिली आहे.स्पर्धेला सुरुवात रविवारी(ता.२५)रोजी सकाळी नऊ वाजता भिगवण मधील लक्ष्मीनगर याठिकाणी होणार आहे .
यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.नामांकित संघांनी स्पर्धेमध्ये आपली नावनोंदणी केली आहे त्यामुळे भिगवणकरांना नामवंत खेळाडूंचा कबड्डीचा खेळ पाहायला मिळणार आहे.स्पर्धेसाठी आलेल्या खेळाडूंची जेवणाची सोय ही ओम क्रिएशन लिनन हाऊस भिगवणचे प्रोपायटर संदीप गुंदेचा व प्रियांका संदीप गुंदेचा यांनी केली आहे.