राहुलकुमार अवचट
केडगाव : जैन धर्माचे पवित्र स्थान असलेल्या झारखंड येथील श्री सम्मेद शिखर पर्यटन स्थळ म्हणून घोषित केल्याने जैन बांधवांकडून निषेध मुक मोर्चा केडगाव येथे काढण्यात आले. अतिशय प्रभावी सिद्धक्षेत्रस श्री सम्मेद शिखरजी झारखंड या पवित्र तीर्थक्षेत्रास झारखंड सरकारने पर्यटन स्थळ म्हणून घोषित केले आहे. सदरच्या निर्णयामुळे या सिद्धक्षेत्राचे पावित्र्य भंग होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
या निर्णयामुळे शांती, समता, बंधुता, अहिंसा असा संदेश देणाऱ्या भगवान श्री महावीर स्वामींना आदर्श देव मानणार ज्या अखंड हिंदुस्तानातील जैन बांधवांच्या भावना दुखावल्या आहेत. त्याचा निषेध म्हणून मोर्चात असंख्य जैन बांधव सहभागी झाले.
जैन श्रावण संघाचे अध्यक्ष निशांत चोपडा, सचिव गौरव गुंदेचा, उपाध्यक्ष संतोष शिलोत, खजिनदार चेतन माडोत, अभय पितळे, प्रशांत मुथा, सचिन पितळे, राजेंद्र गुगळे, मोहित चोपडा, राहुल पितळे, सतीश पितळे, अशोक कोठारी यावेळी संघाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मुकेश मांडोत, सुरेश मांडोत, नवनीत पितळे, सुभाष कासवा, राजेंद्र शहा, रमेश मुथा, मनोज पोखरना, प्रीतम गुंदेचा उपस्थित होते.
यावेळी केडगाव, बोरीपार्धी, नानगाव, वरवंड, पडवी येथील जैन बांधव सहभागी झाले होते. बोरीपार्धीचे सरपंच सुनील सोडनवर यांनी पाठिंबा दिला तसेच पाठिंब्याचे पत्र पुणे जिल्हा युवा सेना शिवसेना समन्वयक निलेश मेमाणे यांनी यावेळी संघाला दिले.
जैन स्थानकामध्ये नवकार मंत्राचे जप-तप करण्यात आले. या मध्ये सरलाबाई मुनोत, सरलाबाई चोपडा, पुष्पाबाई छाजेड, साधना गांधी, स्मीता मांडोत, साधना पितळे, शांताबाई गुगळे, साधना पितळे इ महिला भगिनींनी सहभाग घेतला होता.