राहुलकुमार अवचट
यवत – पुणे जिल्हात प्रसिद्ध असलेल्या यवत येथील श्री महालक्ष्मी मातेच्या यात्रेला आषाढनिमित्त आज मंगळवार असल्याने प्रचंड गर्दी झाली होती.
दोन वर्ष कोरोना महामारीमुळे अनेकांना यात्रा करता आली नव्हती रविवारी वनभोजननिमित्त गावबंद असल्याने आज मोठ्या प्रमाणात पुणे, मुंबई , सोलापुर , नगर , सातारा जिल्ह्यातील अनेक भाविक आपला नवस फेडण्यासाठी यवत येथे दाखल झाले होते.
आखाडातील मंगळवार असल्याने मोठ्या प्रमाणात मांसाहार जेवणावळी परिसरात चालू होती शुक्रवार आठवडे बाजार व रविवारी एकादशी असल्याने भाविकांनी आजच आषाढ साजरा केला.
पाऊस नसल्याने बाजार मैदान भाविकांनी भरुन गेले होते. महालक्ष्मी माता नवरात्र उत्सव मंडळाच्या वतीने देवीची आकर्षक सजावट करण्यात आली होती. यात्रा कमिटीच्या वतीने पिण्याच्या पाण्याचा टँकरची सोय करण्यात आली होती, तर यावेळी भाविकांनी परिसरात टॉयलेटची सोय उपलब्ध असावी अशी अपेक्षा व्यक्त केली.