नऱ्हे : येथील सिग्नेट पब्लिक स्कूल (न्यू) नऱ्हे मध्ये भारतीय भाषा उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. शाळेतील विद्यार्थ्यांनी भारतातील विविध प्रांतातील वेशभूषा करून आली होती. केंद्रीय माध्यमिक शिक्षण बोर्डाच्या सूचनांनुसार तामिळ कवी, लेखक सुब्रमण्यम भरती यांचा जयंती दिवस भारतीय भाषा दिवस म्हणून साजरा केला जातो.
भारतात बोलल्या जाणाऱ्या २२ प्रमुख भाषांमध्ये या मुलांनी आपली ओळख करून दिली आणि त्याचे महत्व सांगितले. तर काही विद्यार्थ्यांनी कविता सादर केल्या. सहा पेक्षा अधिक भाषा बोलता येणाऱ्या दहा पेक्षा अधिक विद्यार्थ्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.
भारतीय भाषांचे महत्व तसेच मराठी भाषेची थोरवी याबद्दल कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे दीपक होमकर यांनी मार्गदर्शन केले. याप्रसंगी शाळेच्या प्राचार्या अजिता परबत, मुख्याध्यापिका सीमा यादव, पर्यवेक्षिका अनुजा जाधव, उल्का नाईक, अनिता कोरे आणि तेजस्विनी धोकटे तसेच सर्व शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व शिक्षकांनी परिश्रम घेतले.