पुणे : मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्दर्शक आणि कलाकार महेश मांजरेकर यांना यवत (ता. दौंड) येथील अपघात प्रकरण चांगलेच महागात पडणार आहे. महेश मांजरेकरांच्या विरोधात टेंभुर्णी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून न्यायालयाने पोलीसांना त्यांच्या विरोधात चौकशीचे आदेश दिले आहेत. याप्रकरणी कैलास सातपुते यांनी टेंभुर्णी पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे- सोलापूर महामार्गावरील यवत गावाजवळ महेश मांजरेकर आणि टेभुर्णीतील संत रोहिदास आश्रमशाळेचे संस्थापक कैलास सातपुते यांच्या गाडीचा अपघात गेल्या वर्षी २०२१ मध्ये झाला होता. त्यावेळी मांजरेकरांनी कैलास सातपुतेंची बदमानी करणारे वक्तव्य केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. सातपुते यांनी मांजरेकर यांच्याविरुध्द टेंभुर्णी पोलिसांत गुन्हा दाखल केला होता.
त्यानंतर मांजरेकर यांनी सातपुतेंबद्दल बदनामीकारक वक्तव्य करून प्रतिमा मलिन केल्याची तक्रार पंढरपूरच्या माढा न्यायालयात देण्यात आली आहे. फिर्यादीची दखल घेत न्यायाधीश गांधी यांनी टेंभुर्णी पोलिसांना मांजरेकर यांच्याविरुद्ध चौकशीचे आदेश दिले आहेत.