नाशिक : शिव रस्त्यावरील अतिक्रमण हटवण्यासाठी पिंपळगाव लेप येथील शेतकऱ्यांनी येवला तहसील कार्यालयात सोमवारी (ता.१२) बिऱ्हाडा आंदोलन केले.
पिंपळगाव लेप येथील शिव रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे आहेत. यामुळे शेतकऱ्यांना ३०० फूटावरील डांबरी रोडवरून जाण्यासाठी तब्बल ८ किलोमीटरचा वळसा घालून जावे लागत आहेत. तसेच शेतमाल, शेतीची अवजारे व जनावरे ने आन करण्यासाठी त्रास होत आहे.
या सर्व त्रासाला कंटाळून अन्यायग्रस्त शेतकरी बाबूराव कारभारी काळे व ईतर शेतकऱ्यांनी बायका, पोर व जनावरांसहीत येवला प्रांत कार्यालया समोर बिऱ्हाड आंदोलन केले. तसेच जो पर्यंत शिवरस्त्यावरील अतिक्रमण हटवल्या जात नाही. तो पर्यंत प्रांत कार्यालयात बिऱ्हाड मांडले आहे.
शिवरस्ता मोकळा करण्यासाठी मागील तिन वर्षांपासून शेतकरी तहसीलदार, प्रांत, जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त कार्यालयांसह पोलीस ठाण्याच्या चकरा मारत आहेत. पाठपुरावा करीत आहेत. शिव रस्ता व पांदन रस्ता मोकळा करून देण्यासबंधीत शासनाचे स्पष्ट आदेश दिले आहेत.
दरम्यान, विभागीय आयुक्त यांनी सन २०२१ मध्ये योग्य ती कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र शासनाचे आदेश असतानाही तहसीलदारांकडून सदर शिव रस्त्यावरील अतिक्रमण हटवण्यात येत नसून कोणत्याही पातळीवर हालचाल होत नाही.
यावेळी जेष्ठ नेते शिवाजी ढेपले, यशवंत सेना सरचिटणीस खंडेराव पाटील, प्रहार जनशक्ती पक्ष उत्तर महाराष्ट्र प्रमुख दत्तुभाऊ बोडके, शिवसेना संघटक येवला तालुका दत्तुभाऊ देवरे, प्रहार जिल्हा सरचिटणीस समाधान बागल, मल्हार महासंघ जिल्हाध्यक्ष आण्णासाहेब सापनर,चांदवड तालुका प्रमुख वैभव रोकडे, दत्तात्रय वैद्य, बापुसाहेब शिंदे , प्रहार नाशिक शहर प्रमुख श्याम गोसावी , देवीदास भडांगे व मोठ्या संख्येने शेतकरी बांधव उपस्थित होते.