लाहोर : चॅम्पियन्स ट्रॉफीचा उद्घाटन समारंभ १६ किंवा १७ फेब्रुवारी रोजी होणार असून यावेळी भारतीय कर्णधार रोहित शर्मा उपस्थित राहण्याची शक्यता आहे. आठ संघांची ही स्पर्धा १९ फेब्रुवारी रोजी कराची येथे सुरू होईल. सुरक्षेच्या कारणास्तव पाकिस्तानला न जाणारा भारतीय संघ दुबईमध्ये आपले सामने खेळणार आहे. भारत २० फेब्रुवारी रोजी बांगलादेशविरुद्ध पहिला सामना खेळणार आहे.
पीसीबीच्या सूत्रांच्या म्हणण्यानुसार, पीसीबीला सर्व कर्णधार, खेळाडू आणि संघ अधिकाऱ्यांच्या व्हिसासाठी सरकारी मान्यता मिळाली आहे. यात रोहित किंवा इतर भारतीय खेळाडू वा अधिकाऱ्यांचाही समावेश आहे. उद्घाटन समारंभ पाकिस्तानमध्ये होईल. पहिला सामना १९ फेब्रुवारी रोजी असेल, तर उद्घाटन समारंभ १६ किंवा १७ तारखेला होईल, असेही ते म्हणाले.