शिक्रापूर : गप्पा मारत उभा असलेल्या मित्र- मैत्रिणींना चौघा जणांनी मारहाण केली. रांजणगाव गणपती (ता. शिरुर) येथील शेळके वस्ती येथे नानाश्री हाईट्स बिल्डींगच्या समोर घडली. याबाबत इंद्रजीत विनायक सुरडकर (वय १९ रा. कारेगाव ता. शिरुर जि. पुणे) यांनी रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिल्याने पोलिसांनी मोहन पंचमुख, सतीश पवार, अतिश गायकवाड, टीन्या ( पूर्ण नाव माहित नाही) यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
इंद्रजीत सुरडकर व संकेत मोरे हे त्यांच्या मैत्रिणीसह गप्पा मारत असताना, मोहन पंचमुख, अतिश गायकवाड, सतीश पवार त्यांचा एक साथीदार दुचाकीहून आले. त्यांनी इंद्रजीत यांना शिवीगाळ, दमदाटी करत बिल्डींग काय तुमच्या बापाची आहे का? असे म्हणून दोघांना लाकडी दांडक्याने मारहाण केली.