दिल्ली: आगामी दिल्ली विधानसभा निवडणुका काहीच दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. राष्ट्रवादी अजित पवार गटाने दिल्ली निवडणुका लढवणार असल्याचे जाहीर केले होते. त्यानुसार आता राष्ट्रवादीकडून दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी स्टार प्रचाराकांची यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार, पार्थ पवार, सुनील तटकरे असे अनेक दिग्गज नावांचा समावेश आहे. दिल्ली विधानसभेसाठी उद्या उमेदवार अर्ज भरणार आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून पक्ष्याच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर करण्यात आली आहे.
स्टार प्रचारकांच्या यादीत या दिग्गजांची नावे
अधिक माहिती अशी की, उद्यापासून दिल्ली विधानसभेसाठी उमेवादीर अर्ज भरण्यास सुरुवात होणार असून वीस जानेवारी ही उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख आहे.या पार्श्वभूमीवर आज राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून निवडणुकीसाठी आपल्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीमध्ये महाराष्ट्रातल्या अनेक दिग्गज नेत्यांचा समावेश आहे. राष्ट्रवादीच्या स्टार प्रचारकांच्या यादीमध्ये एकूण वीस नवे आहेत. ज्यामध्ये अजित पवार, पार्थ पवार, सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल,सुबोध मोहिते, अविनाश अदिक, ब्रीज मोहन श्रीवास्तव, संजय प्रजापती, उमाशंकर यादव, चैतन्य मानकर, विरेंद्र सिंग, दिपाली अरोरा आणि इतर काही नेत्यांचा समावेश आहे.
आगामी दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी उद्यापासून उमेदवारी अर्ज भरण्यात येणार आहेत. येणाऱ्या अठरा जानेवारीला उमेदवारांच्या अर्जाची छाननी होणार आहे. उमेदवाराला वीस जानेवारी ही उमेदवारी अर्ज मागे घेण्याची तारीख आहे तर विधानसभेसाठी पाच फेब्रुवारी रोजी मतदान होईल आणि आठ फेब्रुवारीला दिल्ली विधानसभा निवडणुकीचा निकाल लागणार आहे. अगोदरच दिल्लीत भाजप आणि आप मध्ये मोठा रणसंग्राम सुरू आहे. त्यात आता राष्ट्रवादीने उडी घेतल्याचे पाहायला मिळत आहे.