पुणे: शहरातील चाकण शिक्रापूर भागातून थरारक घटना घडल्याचे समोर आली आहे. शहरातील चाकण-शिक्रापूर रोडवर एका भरधाव वेगात असलेल्या कंटेनरने रस्त्यावरील अनेक वाहनांना जबर धडक दिली आहे. त्यामध्ये एक जणाचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.तसेच इतर अनेक जण जखमी झाल्याचे स्पष्ट झाले आहे. अपघातानंतर तेथील जमावाने कंटेनर चालकाला जबर चोप दिला आहे.
पोलिसांनी तत्काळ अॅक्शन घेत कंटेनरचा केला पाठलाग
अधिक माहिती अशी की, चाकनकडून शिक्रापूरच्या दिशेने कंटेनर वेगाने जात होते. रस्त्यात अनेक वाहने होती मात्र येणाऱ्या गाड्यांना धडक देत पुढे चालले होते. तत्काळ चाकण शिक्रापूर रोडवर सुरु असलेल्या थरारक अपघाताची माहिती दर्शक नागरिकांनी पोलिसांना कळवली. पोलिसांनी तत्काळ अॅक्शन घेत कंटेनरचा पाठलाग केला. या पाठलागाचा थरार लोकांनी कॅमेऱ्यात रेकॉर्ड केला आहे. हा व्हिडिओ सध्या समाजमाध्यमांवर व्हायरल होत आहे.
पोलीस वाहनाला देखील उडवले
मिळालेल्या माहितीनुसार, चाकण परिसरातील माणिक चौकात कंटेनर चालकाने तीन महिलांना उडवून पळून जाण्यासाठी भरधाव वेगाने चालवत होता. तेवढ्यात पोलिस आपला पाठलाग करत आहेत हे पाहून तो रस्त्यात येणाऱ्या गाड्यांना ठोकत कंटेनर जोरात पळवत होता. आडवे आलेल्या पोलीस वाहनाला देखील त्याने उडवले.
या कंटेनरने चाकण परिसरात एका मुलीला धडक दिली. त्यात तिचा पाय शरीरापासून तुटला आहे. या अपघातात एक जणांचा मृत्यू झाला आहे तर दहा ते बारा जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणाचा पोलिस अधिक तपास करत आहेत. कंटेनरचालकावर गुन्हा दाखल केला जात आहे.