मुंबई : बॉलीवूड जगतातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. अभिनेता सैफ अली खानवर अज्ञात व्यक्तीकडून चाकू हल्ला करण्यात आल्याची घटना घडली आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. हल्ल्यानंतर सैफला तातडीने लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
हा हल्ला नेमका का झाला आणि त्यामागील कारणे नेमकी काय? हे मात्र अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही. पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केलाया असून हल्लेखोराचा शोध घेतला जात आहे. सैफ अली खानची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती रुग्णालयाच्या सूत्रांकडून देण्यात आली आहे.